सिंधुनदी
सिंधुनदी : संस्कृत – सिंधु (नदी), ग्रीक — सिंथोस, लॅटिन– सिंदुस.हिमालयात उगम पावणारी एक मोठी नदी. लांबी सु. ३,००० किमी. पूर्वीहिचा उल्लेख ‘किंग रिव्हर’ असा केला जाई. तिबेटच्या नैर्ऋत्य भागातअसलेल्या कैलास पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी उगम पावते. हेउगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेला सु. १०० किमी. व सस.पासूनसु. ५,५०० मी. उंचीवर आहे.